PostImage

सुपर फास्ट बातमी

Today   

PostImage

मतदान करून घरी परतताना अपघातात महिला ठार


 

 

देचलीपेठा : अहेरी तालुक्यातील देचली येथे मतदानाचा हक्क बजावून घरी परतताना जीपमधून खाली कोसळल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना २० नोव्हेंबरला दुपारी अडीच वाजता घडली. पोरीयाबाई विजया वेलादी (वय ५०, रा. आसली) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे देचली केंद्रावर मतदान होते. त्यासाठी एका उमेदवाराने दिलेल्या जीपमधून त्या गेल्या होत्या. आसली ते देचली हे तीन किलोमीटर अंतर आहे. मतदान करून इतर महिलांसमवेत परतत होत्या. वाटेत खड्यात जीप आदळली. यावेळी त्या खाली कोसळल्या. डोक्यातून रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला.

 

मतदानाचा हक्क बजावून आले अन् काळाने गाठले

 

एटापल्ली : येथे मतदानाचा हक्क बजावून घरी परतल्यानंतर एका व्यावसायिकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. शरीफ शेख (वय ५५) असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे. सकाळी अकरा वाजता त्यांनी एटापल्लीतील केंद्रावर तासभर रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजाविला. त्यानंतर ते घरी परतले. मात्र, त्यांना छातीत वेदना होत असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेले; परंतु डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.